रविवार, १५ जानेवारी, २०१७

"राजे पुन्हा एकदा जन्माला या"


 --------------------------------
  राजे पुन्हा एकदा जन्माला या
---------------------------------

स्त्रियांचा अपमान करणारे प्रसंग जेव्हा घडले
वाचतो इतिहासात, तुम्ही हात त्यांचे तोडले
नाराधमांना या क्रूर, धडे चांगले शिकवून द्या
म्हणून विनवतो राजे पुन्हा एकदा जन्माला या ।

शेतकऱ्यांचीही तुम्ही, केली होती कीव
स्वातंत्र्या नंतरही आज, देतोय शेतकरी जीव
हरवलेलं अस्तित्व त्याच, परत एकदा मिळवून दया
म्हणून विनवतो राजे, पुन्हा एकदा जन्माला या ।

ते मावळे वेगळे होते, इतिहासी अमर ठरले
आमच्या आजच्या नेत्यांनी, घर त्यांचेच भरले
वेळ आली योग्य आज, जागा त्यांची दाखवून दया
म्हणून विनवतो राजे, पुन्हा एकदा जन्माला या ।

आजची पीढ़ी आमची, दिसत नाही भानावर
डोक्यावर घेउन् नाचतो तुम्हा, पन फ़क्त डी.जे. च्या गाण्यावर
भक्ती नेमकी असते काय, परत एकदा दाखवून दया
म्हणून विनवतो राजे, पुन्हा एकदा जन्माला या ।

मावळ्यानीच आजच्या, स्वराज्य तुमचे भंगवले
तुमच्या नावाखालीच राजे, राजकारण जातीचे  रंगवले
दुर्बुध्धांना या, जरा राजकारण समजावून दया
म्हणून विनवतो राजे, पुन्हा एकदा जन्माला या ।

                             विशाल मोहिते-पाटील
                                   9921211803
                                   (साखळी बु।।)
---------------------------------
                                    28.02.2016

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा